सोमवार, १७ मे, २०१०
शोध स्वतः चा....
मला आजकाल माझी बुध्दी खुंटली आहे की काय अस वाटू लागलय... जवळजवळ एक वर्ष होइल मला पत्रकार म्हणुन काम करतेय... पण बातम्यांशिवाय अवांतर लिखाण पुर्णतः थांबलयं... पत्रकार म्हणुन बाहे फिरते...वेगवेगळ्या..समाजाच्या स्तरांमधील लोकांना भेटते... खूप वेगवेगळे अनुभव असतात...काही मोठ्या माणसांमधल्या पोकळ्या मन सुन्न करतात.. तर खुप लहान(नवानेच फक्त) समजाकरता कहितरी करण्यासाठी धडपडतात.. बरेच अनुभव घेते मी..थक्क करणार असत सगळ. पण व्यक्त होताच येत नाही...शब्द आणि भवना मनात आत आत कुठेतरी फकत झिरपत जातात इतकच काय ते... शब्द.. शब्धांची साथ बातमी लिहण्यापुरतीच मर्यादित राहतेय...काय चुकतय नेमक कळत नाहिये.. पण काहीतरी हरवतय.. काहीतरी तुटतय.. हे कळतय.... वगण्यतला जिवंतपणा कोरडा होत होत सगळच अनैसर्गिक होत चाललय .. माझ वागण बोलण आणि मीही... अगदी सगळच...पण ही पोस्ट प्रमाणिकपणे लिहण्याचा प्रयत्न करतेय... परत शोध सुरु करायला हवा... काही धागे लागले होते हाती... पण आता विस्कटलय सगळ.. का ..कशामुळे.. मला जे हव होत ते मिळतय..मग मी का जतेय माझ्यापसूनच दूर... शोधायला हवय... परत सुरु करायला हवा शोध स्वतः चा....
गुरुवार, ६ मे, २०१०
एक क्षण....
एक क्षण हवा मला माझा...
मला हवा तसा....
मीच सजवलेला... माझा एक क्षण....
स्वैर हवा तो... मुका नको...
शब्दाळलेलाही नको...
बोलका जिवंत पण माझा...मला हवा तसा...
एक क्षण......
(लै कंटाळा आलाय राव...वेळ नाही मिळत कशालाच ...)
मला हवा तसा....
मीच सजवलेला... माझा एक क्षण....
स्वैर हवा तो... मुका नको...
शब्दाळलेलाही नको...
बोलका जिवंत पण माझा...मला हवा तसा...
एक क्षण......
(लै कंटाळा आलाय राव...वेळ नाही मिळत कशालाच ...)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)