तिचा तो प्रेमळ-उष्ण स्पर्श..
सत्य कळल्यावर दिलासा देण्यासाठी
पुढे केलेला तो हात
माझ्या हातावर विसावला तो कायमचाचं....
तो उष्ण स्पर्श शेवटचा होता ह्यावर
माझा अजून विश्वास बसत नाही..
ये ना गं.. प्लीज ये ना..
ती अजूनही आकाशाकडे डोळे लावून
विनवणी करतेयं तिला..
कदाचित आकाशातून बघत असेल ती हिला
मी अस्वस्थ असताना..
अभाळाची मऊ कुशीही बोचत असेल ना तिला?
जेव्हा हे जाणवतं..
तेव्हा ती खडबडून उठते.. डोळे पुसते..
आभाळाकडे बघतं तिला सांगते..
अगं मी मजेत आहे..
तूला माहित्येय ना मध्येच असे झटके येतात मला
तू तिथे सुखी रहा..
पण तिला मनातला आवाजही येत असेलच की
आता खर तर अंतर संपलयं
मग तिची ओढ का?
हा खेळ बहुदा हिच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालेल
ते तिने दिलेल्या श्वासांचं ऋणचं म्हणायचं
...स्नेहा
शोध स्वतःचाच...
एक खुळा प्रयत्न.....
सोमवार, २७ जून, २०११
शुक्रवार, २४ जून, २०११
Just wants to say Love You All..
लहानपणी पेल्यातल्या वादळानं किती गडबडून जायाचो ना आपण? आता खरी वादळं जोमानं झेलतो तरी त्या वादळाचं अप्रृप वाटतं.. प्रामाणिकपणे सांगायचं झाल तर ती वादळ स्वीकारली तर त्यांच्याशी खेळायला मजा येते.. मग काही दिवसांनी त्या वादळाच काही अप्रृप वाटणंचं बंद होतं... रोज रोज नव्यानं येणारी अवघड परिस्थिती.. पहिल्यांदा काहीशी घाबरवते.. मग हट्टी स्वभावाला chalenge करते.. मग आपण मात करतो त्या परिस्थितीवर... पण मग त्याचा आनंद वाटतोय न वाटतो तर दुसरं challenge... रोज रोज भांडण.. स्वत:च्याच आयुष्याशी..पर्याय नसतो दुसरा.. सामोरं जायाचं नाहीतर हरायाचं इतकच..गम्मत याची वटते सामोरे जातो तेव्हा लोकं पाठ थोपटतात आणि बावरून थांबतो तेव्हा सुरूवातीला कुरवळणारी हिच लोकं नंतर झटकतात.. अर्थात ही स्थिती येऊ द्यायचीच नाही कधी स्वत:वर.. नाहीतर स्वत:चा अपमान स्वत: करून घेतल्यासारख होतं..आणि ही स्थिती येतही नाही कारण आपली माणसं असतात..सख्खी नसतील कदाचित पण सख्याहून कितीतरी जास्त.. तेव्हा जाणवतं देव निष्ठूर नक्कीच नाही ... आपल्या जवळची माणसं खुप कमी असतील कदाचित पण ती आपली असतात... ती असणं हे देवबप्पाचा आपल्यावर विश्वास असतो...त्या शिवाय आजारपणात सेवा करणारे आपले गुरू आणि त्यांचं कुटूंब भेटत नाही वा मित्र-मैत्रिण असणारे तरी वडीलकीचं नातं जपणारी माणसं.. अचानक हॉस्टेल सोडाव लागणार ऐकताच डोक्यावरचं छत उडण्याची भिती नुसती मैत्रिणीला बोलून दाखविली तर कोणाला घर मिळत? नाही ना.. माझ्या देवानं मला अशी मैत्रीण दिली... माझी मैत्रीण... फक्त वाईट याचचं वाटतं मला या सगळ्यात ..माझ्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम कोरड होत गेलं या वादळांमध्ये...झरा आटला शब्दांचा..पण भावना कोरड्या नाही झाल्या..माझं माझ्या या माणसांवर खुप खुप प्रेम आहे.. त्यांनी खुप दिल म्हणून नाही.. काही दिल नसतं तरी होतं.. आहे..फक्त व्यक्त करता येत नाही इतकंच... आज इतकंच सांगायचयं love you all :) मी एकटी झुंजत नाहिये तूम्ही आहात सोबत..तुम्ही असण ही ताकद आहे माझी...
स्नेहा
स्नेहा
सोमवार, १३ जून, २०११
Dear पाऊ(सा)
Dear पाऊ(सा)
तू आलास..finaly...:)
कसला गोड आहेस माहित्ये तू? तू आलास की सगळ वातावरण सही होतं... प्रत्येक जण पहिल्या सरी साजर्या करताचं रे... लहान मुलांपासून थोरा-मोठ्यांचा तू लाडकाचं पण या वेळी तूला पत्र लिहिले कारण वेगळयं.. पाऊ एकशील का रे माझ एक? छान पड तू.. भरभरून कोसळ.... पण आभाळातूनच.. यावेळी तरी कोणाच्या डोळ्यातून पाझरू नकोस.. मला माहित्येय प्रत्येक ऋतूला शापच आहे.. ग्रेस म्हणतात तसा.. रोज बोलतोच आपण पण आज तूला विनंती करायची होती म्हणूनहे लिहीत बस.. प्लीज... पाऊ येत राहा..पण आनंद घेऊन तूला कोणी वाईट म्हणालेलं मला नाही आवडणारं..बोलत राहूच आपण..
तूझीचं
...स्नेहा
तू आलास..finaly...:)
कसला गोड आहेस माहित्ये तू? तू आलास की सगळ वातावरण सही होतं... प्रत्येक जण पहिल्या सरी साजर्या करताचं रे... लहान मुलांपासून थोरा-मोठ्यांचा तू लाडकाचं पण या वेळी तूला पत्र लिहिले कारण वेगळयं.. पाऊ एकशील का रे माझ एक? छान पड तू.. भरभरून कोसळ.... पण आभाळातूनच.. यावेळी तरी कोणाच्या डोळ्यातून पाझरू नकोस.. मला माहित्येय प्रत्येक ऋतूला शापच आहे.. ग्रेस म्हणतात तसा.. रोज बोलतोच आपण पण आज तूला विनंती करायची होती म्हणूनहे लिहीत बस.. प्लीज... पाऊ येत राहा..पण आनंद घेऊन तूला कोणी वाईट म्हणालेलं मला नाही आवडणारं..बोलत राहूच आपण..
तूझीचं
...स्नेहा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)