गुरुवार, ४ डिसेंबर, २००८

... परत एक शोध... काहीतरी सापडविण्याचा प्रयत्न

ती रात्र काळी कुळकुळीत... कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी राहवत नाहिये.. आज्काल माझी चिडचिड वाढली आहे अस सगळ्यांचच मत आहे... माझ्या सारखी मुलगी राग व्यक्त करतेय. माझे पेशन्स् कमी झालेत... मी खूप जास्तच रिअक्ट होतेय..वैगेरे माझ्या-मित्र मैत्रिंणींच मत आहे.. हो माझे पेशन्स् नक्किच कमि झालेत.. चिडचिड वाढली आहे.. पण तिला कितपत अवास्तव म्हणाव हे कळत नाहीये..मी २६ तारखेला घटणा स्थळी होते.. एका नामांकित वाहिनीसोबत.. जे तुम्ही टिव्हीवर पाहात होता ते मी प्रत्यक्ष पाहिलय.. त्या वेळी स्वत: खूप हतबल झाल्याच जाणवत होत.. किंबहुना मी.. मी काय तिकडे असलेले सगळेच्जणं मला तसे वाटत होते.. हतबल!! आपण सगळा तमाशा डोळ्याने बघतो परंतू काहीच करू शकत नसतो... माणस येतात जखमी अवस्थेत असतात... तडफ़डत मरणाच दार ठोठावतायेत असा वाटुन जात... नातेवाईकांचा अक्रोश सुरवातीला ऐकू येत असतो परंतू नंतर सगळ सुन्न होत... ताज मधला गोळीबार ऐकलाय मी.. पोलिसांची धावपळ बघितलि आहे मी... हॉस्पिटाल बाहेरचे रक्त.. रस्त्यावरचे रक्ताचे ओघळ काही केल्या डोळ्यासमोरुन हटत नाहीत.. मी जास्त नाही लिहणार या बाबत.. मला खूप त्रास होतोय.. त्रास या बबत नाहि की मी हे बघितल आहे.. उलट बघायला मिळाल हे बर.. सत्य जाणुन घेण्याची क्षमता मला कळलि.. पण स्वतःच्या हतबल पणाची कीव येतेय... आणि परत परत तिच दृष्य येतायेत डोळ्यापुढे...
आणि एक कटु सत्य जे माझ्या मागच्या पोस्टवर झळकलय.. ते मात्र पचयला कठिण गेल होत.. अताशा तेही सवयिच झालय.. आज मला माझा एक मित्र म्हणाला का काही पाउल उचलायची भाषा कर्तेस.. का वढि भडकली आहेस.. आम्हीही भडकलो होतो पण आमची आग क्षमली.. तु ज्या लोकांसाठी करायच म्हणतेस तेच अशी भाषा बोलतात.. पण माझ उत्तर अजुनही एकच आहे.. कोणासाठी म्हणुन नाही करायचय .. करण मला करायच आहे... कोण याची दखल घेउ देत अगर नको घेउ देत मी माझा मर्ग शोधतेय.. मी माझ्या पासुनच सुरवात कर्तेय.. कोणाच्या सोबतीची आशा न ठेवता.. येणारे येतील मी मत्र आत थांबणार नाही

सोमवार, १ डिसेंबर, २००८

२६... पडसाद .. आणि...

भारताच्या इतिहासाच काळ पान.. जे काही होत ते प्रत्यक्ष बघितलं होत... रक्त.. जखमी.. आणि रक्तबंबाळ मृतदेह... रक्त रक्त रक्त.. सुरवातीला नातेवाईकांचा आक्रोश ऐकु येत होता पण नंतर काहीच ऐकू येयीनासे झाले.. सगळ शुन्य नजरेने बघणारी मी मला आला पैकी वाटु लागली आहे... या विषयावर इ नंतर लिहीन कदाचित पण आज नको.. कारण आजुनही गोळ्यांचा आवाज कानामध्ये घुमतो आहे..काल परत ताज आणि ओबेरॉयला जाऊन आले. २६ तारखेला रात्री सुरु झालेल युध्द.. काल बरच सावरलेल जाणवत होत.. त्या विभागात हे प्रकरण झाल्यापासुन तिकडे जाण्याची माझी ही तिसरी वेळ... पण काल गर्दी वाढली होती.. ताजकडे अजुन जाऊ देत नव्हते पण ओबेरॉय पाशी लोकांची झुंबड होती... आज लोक समुद्राकडे पाठ फ़िरवून होते... सगळे रिकाम्या ओबेरॉय कडे वास्ताविक पाहता त्याच्या फ़ुट्लेल्या काचांकडे आणि दहशदवाद्यांच्या गोळीबारामूळे काळवंडलेल्या खिडकीपूढे आज गर्दी करुन उभे होते... आज सगळ्याच्या हातात कॅमेरे होते... मला त्यांना एक विचारायचीखुप इच्छा होत होती की का? का काढताय फोटोज् आणि व्हिडिओ..? पण.. असो.. तिकडे एका ग्रुप ने विशेष लक्ष वेधुन घेतल... चार पाच टाळकी होती ती आपल्याच वयाची.. चार्ट पेपरवर काहिसे संदेशे लिहून आणले होते.. नंतर ते जमिनीवर ठेवुन सगळ्या लोकांना मेणबत्या देत होते... त्या पेपरवर काही संदेश लिहले होते जसे.. मुंबई आय अम विथ यु .. वैगेरे अशा आशयाचे ... मीही गेले एक मेणबत्ती लावली.. क्षणभर डोळे बंद केले.. पण मला काही केल्या शांतता मिळतच नाहीये... नंतर मी त्या मुलांशी बोलायला गेले.. त्यांच आधी अभिनंदन केल... खूप बर वाटल होत मला आत कुठेतरी कोणितरी आपापल्या पध्दतीने का होईना..पण पाऊल उचलण्याचा प्रयन्त करतय? त्यांना हे बोलुनही दाखवल.. नंतर मी त्यान्न विचारल तुम्हाला अस नहि वाटत का आपण अजुन काहितरी करायला हवय? आणि त्यांना जे काही शक्य होइल त्या बबत माहिती दिली (ती मी इथे देZणार नाही..करणं नंतर केव्हातरी) मला त्याच्या कडुन आशा होती.. पण चुकलच माझ त्या ग्रुप मधल्या एका मुलाने सरळ सांगीतल.. म्हणे नाही आमच्याने हे शक्य नाही .. करण काय तर आम्हला वेळ नसतो.. मी विचारल मग आज तरी का वेळ काधला? नो वि जस्ट वॉन्ट तु शो थे मुंम्बई डत वि आर विथ मुंम्बई... माझ टाळक सटकलच... मी Mहणाले अचुलि थॅकस् बट काही गरज नाहीये या सगळ्याची तुम्ही मुंबई बरोबर नाही मुम्बई तुमच्या बरोबर आहे तुम्हाला काही पर्याय नाही म्हणुन तुम्ही इथे आहात... आणि हे जे काही चार मेणबत्त्या जाळून तुमची शोक सभा दाखवताय किंवा तुमचा सपोर्ट दाखवताय याचीही काहीही गरज नाही.. इटस् ऑल बुलशिट.. मला कळतय तुम्ही हे का कर्ताय एक तर आज रविवार त्यामूळे वेगळा वेळ काढायची गरज नाही.. त्यात अस काही केल की 'आपण काहीतरि केल' अस समाधान मिळुन जात.. त्यात मिडिया वाले असतातच कोणास थाउक तिव्हीवर झळकायला पण मिळेल तेवढच कौतूक सगळीकडे(मी जेव्हा त्याच्याशी पहिल्यांदा बोलण्यास सुरवात केली होती तेव्हा ते मला पत्रकार समजले होते.. आणि नंतर कळल मी हे बोलायला नको हव होत)..मी खूप भडकले होते.. त्या वेळेस माझ्या डोल्यासमोर का कोण जाणे करकरे, साळस्कर, कामठे उभे होते.. संयम सुटला होता.. त्यांना म्हणाले तुमच्याशी बोलुन मी माझा वेळ आणी उर्जा दोन्हीही फुकट घालवली.. असो.. मी निघाले त्या मुलांपैकी एकाला काय वाटल कोणास ठाऊक त्याने मला माझा नंबर मागितला.. मी क्षणभरविचार केला आणी त्या मुलाला नंबर दिला.. तो म्हणाला वेट आय विल गिव्ह यु मिस कॉल.. आय सेद्ड नो नीड.. आय डोन्ट हॅव दट मच स्पेस इन माय मोबाइल.. वास्ताविक पाहता मी इतकी रुड कोणाबरोबर नसते.. पण तेव्हा माझ्या डोळ्या समोर पुर्ण २६ची रात्र होती.. आजुनही तो गोळ्यांचा आवाज घुमतोय.. अस म्हणता म्हणता आता त्या नंतर उरलेली निरव शांतता जास्तच किंचाळतेय तो आवाज त्या गोळ्यांपेक्षा कर्कश वाटतोय... आपण सगळेच काय करतोय आणी आपण काय करायला हवय? तुम्हाला काहीच छळत नाही का?
मला कळतय की मी खूप जास्त बोलतेय किंवा मी इतक बोलायला नकोय पण आत काहीतरी खूप खदखदतय.. मला एक मर्ग सापदलाय आणी त्या मर्गावरुन जाण्याचा निश्चय मी केलाय.. निदान मी प्रयत्न तरी करणार आहे.. तुम्हीही तुमचे मार्ग शोधा जर वेळ मिळालाच तर.. [ परत खवचट :( ]