सोमवार, ५ मे, २००८

कच्च गणित

गणित... माणसाच आणि गणिताच नात अजबच आहे... नावडता विषय तो.. क्वचित कुणाला अवडतोही... पण आवडो न आवडो आयुष्याच गणित सगळेच मांडतात ना? कोण आलं कोण गेलं? कोणी किती केल किती नाही? किती मित्र किती शत्रू ? कोण किती आपल किती परकं? याहून निरनिराळी गणित असतात... मी तशी कच्चीच आहे गणितात... त्यामुळे ही कदाचित अनुभवलेली गणित लक्षात राहिली असावी... पण नाही सहन होत हा व्यापार... निरपेक्ष कोणालाच जगता येत नाही आणी कोणी जगत असेल तर ते जगाला मान्य नाही का ? बहुदा इथेही व्यवहारच निरपेक्ष जगल की बाकी शुन्य येते... पण सगळ्यांना बाकी शिल्लक हवी असते...थकते मी या सगळ्याला... नको ते गणित नको त्या आयुष्याच्या बेरजा वजाबाक्या... सरतेशेवटी हाती शुन्यच लागणार.. का माझीही काहीतरी बाकी उरणार?आता मलाच कळत नाही मला बाकी हवी का शुन्य? जगासारखं गणित पक्क नाही इतकच उमगतय.. मला मिसळुन जायला आवडत ...जमतही ... पण इथे प्रत्येक आकडा वेगळाच... मग मी बेरजा करत सुटते झालाच तर गुणाकार... पण समोरचा भागाकार करत असतो... आणि नेमकी त्याला बाकी शुन्यही नको असते... अपुरं जगायच.. अस अपुर जगण्याची सवय सगळ्यांनाच झाली आहे.. आवडतही ते सगळ्यांना... सोयीच वागणं ते... सोयीनेच ठरवतात सगळे भागाकार... गुणाकार... बेरिज की फक्त वजाबाकीच.... छे माझं गणितch कच्च ...

...स्नेहा